नात प्रेमाच्या बंधाच.....
नात प्रेमाच्या बंधाच.....
पूर्वी खायचो आईच्या हातची भाकरी
आता येते स्वप्नात सारखी
जेव्हा कष्ट करी बाप रानावनात
तेव्हा धनधान्य येई घरा जोमात
आई या शब्दाचा उल्लेख फक्त करायचा नसतो
तो शब्द काळजात जपून ठेवायचा असतो
बापाचं काळीज मुलांच्या चांगल्यासाठी झटतं
तर आईचं काळीज मुलांना मायेनं जवळ घेण्यासाठी तूटतं
बाप हा बाप असतो
अश्रूंनी भरलेल्या डोळ्यामागील वाघ असतो
आई ही आई असते
अश्रूंनी ओघळणारी वाघीण असते
काय असेल या नात्यांचा खेळ
कधी उमजून आली नाही ती वेळ
का कळतं नाही कोणाला बापाचं प्रेम
खरच!आईच्या प्रेमाने पडतो का? त्याच्यावर विसर!!
नात्यांच्या या जाळ्यामध्ये
गुरफटून गेलोय
कोण आपल आणि कोण परकं
याचं विश्लेषण करतो आहे
कधी कळेल का कोणाला
या नात्यांमधला दुरावा
कोणी देईल का याला दुजोरा....
मन सुन्न होतं जेव्हा
नात्यांमधील गणित मांडताना
ते अधिक गुरफटत जातं.....
