STORYMIRROR

Vikas Kharat

Romance

3  

Vikas Kharat

Romance

सहवास तुझा

सहवास तुझा

1 min
520

शब्द माझेच होते

तरीही तुझा अबोला

मात्र कायम होता


हृदय माझं होतं

पण स्पंदने

मात्र तुझी होती


हल्ले तू केले

पण उध्वस्त

मात्र मी झालो


तुझी साथ

मला लाभेल याचा

विचार अजून केला नव्हता


सहवास

मात्र तुझा

लाभला होता


दुष्काळातसुद्धा

☔पाऊस

पडला होता


इंद्रधनू

सुद्धा

नटला होता


असा

सहवास तुझा

मला लाभला होता


सोसाट्याचा वारा अलगद

कानावर

पडला होता


आवाज तूझा ऐकताच

ज्वालामुखीचा

उद्रेक झाला होता


तुझ्या येण्याच्या चाहुलीने

झाडे वेली

सजल्या होत्या


पुष्पगुच्छ

घेऊन हातामध्ये

स्तुतीसुमने उधळत होत्या


असा सहवास

तुझा मला लाभला होता...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance