या मनात फक्त तुझाच चेहरा
या मनात फक्त तुझाच चेहरा
आठवण येती तुझी मला
क्षणोक्षणी आठवू लागलो तूला।
तुझ्या त्या केसातील तो विलक्षण गजरा
मला सांगून जातो, क्षण करतू साजरा
तुझ्यासाठी प्रत्येकाला करतो मी मुजरा।
या हद्यात तूझाच विचार असतो पण
तुला माझ्याकडे पाहण्यासाठी वेळच नसतो
जेव्हा-जेव्हा येतात, डोळ्यासमोर तुझेच चेहरे
असे वाटते पाहतच रहावे सारखे।
तुझ्या मागे लागलो फिरु
या काळजात तुझाच विचार सुरू
मन फिरु लागले, झुरु लागले तरीपण
या काळजात तूझेच नाव कोरू लागले।
ध्यानीमनी तूझाच विचार चालू असताना
बाजूला नीरव शांतता असताना
तान्ह-भूकेचा विचार न करता खातो खस्ता
तेव्हा वाटते, आपला होईल का? लवकर बस्ता।।
या मनात फक्त
तुझाच चेहरा, तुझाच चेहरा...

