प्रेम एक पर्व
प्रेम एक पर्व
आयुष्याने दिल होतं एक नवीन पर्व
त्या पर्वामध्ये तिला होता गर्व....
जसा पडला होता तो प्रेमात
तसा भाऊसाहेब पडला होता पानिपतात
नव्हते उरले काही ध्यानीमनी
उरला होता तो फक्त वनवास
त्या वणव्यामध्ये पेटत होता
रात्रकालीन मशालीसारखा
आठवूणी तिच्या आठवणी जीर्ण
झाला होता मनाने विदीर्ण
प्रेमात पडण्यापूर्वी
कसा होता त्याचा झगमगाट
आता मात्र आहे
फक्त कमालीचा शुकशुकाट
आईबाबा ओरडून सांगू पाहात होते
तेव्हा नाही ऐकला त्यांचा आवाज
गेली होती सोडून ती
आता उरला होता फक्त त्याचा देहांत
कृष्ण-विवरांमध्ये शोधत होता तिला
जीव झाल्यावानी येडापिसा
आज ते हृदयपण शांत झालं होतं
तिचं नाव घेताच थरथर कापत होतं
