तूझ्या प्रेमाच्या चांदणराती...
तूझ्या प्रेमाच्या चांदणराती...
तू जीवाला गूंतवावे
नकळत सारे घडवून आणावे
तुझ्याच स्वप्नांच्या सुखापायी
मी भटकतो आहे अनवाणी
अरे वेड्या मना
का देतोस या प्रेमाला अनोळखी दिशा
जीव होतोय येडापिसा
तिला बघतच बसताना
जुळता-जुळता जूळलकी
न पाहताच ते उमगल की
तूझेच सूर राहू दे ओठी
नको आणू तू यामध्ये आडकाठी
तू तिथे मी
असा खेळ चालू आहे उन-पावसाचा
या ओल्याचिंब सरीत
तु सुद्धा दिसतेय मला बागडताना
तुझ्या सुखांच्या सरीने
मन हे माझे बावरे
तुझ्या नानाविध प्रेमरंगाने
मन हे माझे सावरे
अजूनही चांद-रात होती
उमगली नाही तूझी कळी
जुळून येत होत्या त्या चांदराती
तूझ्या प्रेमाच्या रेशीमगाठी

