STORYMIRROR

MAHENDRA SONEWANE

Romance

3  

MAHENDRA SONEWANE

Romance

आठवण

आठवण

1 min
11.7K

आठवण झाली तर मी

येईन तुझ्या ओठावरच्या गीतानं, 

मनापासून एकदा आठवून तर बघ

तुझ्या तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्यानं


अगं तुला लपवताही येत नाही

तुझ्या मनातलं कुठं बोलताही येत नाही, 

मी आलो तर तू बेचैन होतेस 

मनातलं माझं काही तुला सांगताही येत नाही


फक्त तुलाच पाहत राहावे 

असं विचारच करीत राहिलो, 

खरंच तुझ्या नादाने

मी स्वतःच हरवित राहिलो


काय करू मला प्रेमाची

बाग फुलविता येत नाही, 

तुझ्यासाठी गिफ्ट तर सोड 

शब्दही मांडता येत नाही


तरी तुला उन्हात न्यावंसं वाटते 

मी तुझी सावली बनावंसं वाटते, 

तुला आपल्या जवळच ठेवावंसं वाटते 

सर्व कामे विसरुन, तुझ्यात रमावेसे वाटते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance