STORYMIRROR

Sanjana Kamat

Romance

3  

Sanjana Kamat

Romance

निवळले मन

निवळले मन

1 min
11.8K

निवळले मन नक्षत्राने सजलेले,

मी तू पणाचे पंख हळूहळू गळलेले

आशा अपेक्षांची स्वप्ने उरात लपलेले,

प्रेमाच्या फुंकरेने जग जिंकलेले


दोघांचे मन एकमेकास समजले,

अहम्, अहंकाराची वादळे विरघळले.

दोन शरीर, एक श्वास आहोत कळले,

निवळले मन काळचक्रात गुंतलेले


शांत चांदणे स्पर्शगंध आठवीत,

प्रेमळ सहवासात चिंब भिजत

भांडण, रूसवे सारे मावळत,

निवळले मन संसार वेल फुलवीत


अंतराच्या बंदरात उभे रुपेरी गलबत,

मधूर सुंगंधी वाट अतृप्त नजर शोधत

निवळले मन विरह यातना सोसत,

मोत्याचे क्षण गेले मुठीतून अलगद


संसार चटके पेहलू हिरा चमकवत,

प्रपंच वेलीला निशिगंध बहरत

स्वप्नपूर्तीसाठी संघर्षाने लढण्यात,

निवळले मन गंगेच्या पाण्यात न्हात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance