STORYMIRROR

Suhas Belapurkar

Romance

3  

Suhas Belapurkar

Romance

गालावरची लाली

गालावरची लाली

1 min
11.9K

दाटून येता मेघ नभीचे, तव स्पर्शाची चाहुल झाली

अन् गालावर ही लाली, बघ कशी अचानक आली 


नदीकिनारी बसलो असता, वाऱ्याची ही झुळूक आली

अन् गालावर ही लाली, बघ कशी अचानक आली 


प्राजक्ताच्या झाडाखाली, फुलांमध्ये तू सचैल नाहलि

अन् गालावर ही लाली, बघ कशी अचानक आली 


मोरपीस ते गालावरती, हळूच फिरविता तू मोहरली

अन् गालावर ही लाली, बघ कशी अचानक आली 


स्वप्न आपुले बघता बघता, डोळे मिटुनी रंगून गेली

अन् गालावर ही लाली, बघ कशी अचानक आली 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance