आस श्वासाची
आस श्वासाची
1 min
39
नभ भरल ढगांनी, अंगाचीही झाली लाही
आस लागे धरित्रीला, चार थेंबांच्या श्वासाची
साता-समुद्रा पल्याड, दूर गेलं ग लेकरु
आस लागे माऊलीला, श्वास तिचा ग कोकरू
सासरी गेली लेक, सोडून माहेराचा पाश
आस लागे आठवांनी, माय-बाप तिचा श्वास
काम करी दूर माय, तिचे चित्त पिलापाशी
आस लागे जिवा तिच्या, कधी पाहिन श्वासासी
आली आषाढाची वारी, जातो पंढरीच्या द्वारी
भेटू विठू हीच आस, असे विठू हाच श्वास
