ठिणगी
ठिणगी
आगीची एक ठिणगी, गवतावर पडते
बघता बघता साऱ्या, गंजीलाच आग लावते
वादाची एक ठिणगी, संसारात पडते
बघता बघता, कधीकधी, साऱ्या संसारालाच आग लावते
संशयाची एक ठिणगी, मनामध्ये पडते...
बघता बघता, भावनांचा मोठा स्फोट करते
प्रेमाची एक ठिणगी... काय सांगावे…हृदयात पडते...
हळूहळू जीवनालाच बहार आणते
एक ठिणगी, दारूगोळ्याचा स्फोट करते
गावच्या गाव, बेचिराख करते
: transparent; color: rgb(0, 0, 0);">वीजेची एक ठिणगी, पृथ्वीवर येते
अचानक काहीतरी, विपरीत घडवते
लाईटरची एक ठिणगी चूल पेटवते
सुग्रास अन्न बनवून, जठराग्नी शमवते
एक छोटीशी ठिणगी, शेकोटी पेटवते
थंडगार जीवाला, छानदार ऊब देते
फुलबाजीच्या असंख्य ठिणग्या, आनंदाची बरसात करतात
चितेवरील असंख्य ठिणग्या मात्र हृदय पिळवटात
ठिणगी वेगळी, पण ताकद केवढी..
ठिणगी... आयुष्य बहरते... वा… बेचिराखही करते!