वळवातील हूरहूर
वळवातील हूरहूर

1 min

20
अळवाच्या पानावरी, पडे वळवाचा थेंबl
हुरहूर दाटे मनी, कुठे असेल ते प्रेमll
वाहत्या वाऱ्यासंगे, तिला धाडला सांगोवाl
दडलीस कुठेशीही, तुझा घेईन मागोवाll
कापसाच्या ढगामागे, ती लपून बैसलीl
संधिप्रकाशामागे, तिची चाहूल लागलीll
कडाडली वीज अन बरसल्या धाराl
अंगणी शिंपल्या, जणू प्रेमाच्या त्या गाराll
वळवाच्या पावसाने, मन चिंबून भिजलोl
आठवांनी तिच्या मग, उदासी बैसलोll
नदीच्या त्या पैलतीरी, आम्हा दृष्टा-दृष्ट झालीl
खळाळत्या पाण्यासंगे, लटके हळूच हासलीll