नवा रंग
नवा रंग
तुझ्या ओठांना माझ्या ओठांवर
अलगद टेकवून
तू प्रेम व्यक्त करायचीस
खरं सांगू,
त्या मिलनाच्या वेळी
तू रातराणीपेक्षाही जास्त फुलायचीस
अन् म्हणायचीस
आपल्याही प्रेमाचा
इतिहास लिहिला जाईल
तू फक्त मला चुंबुन बघ
टेकव माझ्या ओठांवर तुझे ओठ
अन् इंद्रधनूलाही चढणार नाही
असा आपल्या मिलनाला आठवा
नवा रंग चढेल बघ...

