प्रिया
प्रिया
तू आहेस माझ्या अंगणातील तुळस
तू आहेस माझ्या मन मंदीराचा सुवर्णकळस
तुझ्या असण्याने आहे आयुष्यात मोगरी दरवळ
तू प्रेमाचा पारिजात तू सुगंध केवळ
मनाच्या देव्हाऱ्यातील समईची वात तू
उन्हाळल्या भुईला वसंताची साद तू
तुझ्या हसण्याने उमलते आकाशात चांदणे
तुझ्या असण्याने बहरती मनी चंदनाची वने

