STORYMIRROR

सानिका कदम

Romance

3  

सानिका कदम

Romance

काहीतरी सांगायचंय मला......!

काहीतरी सांगायचंय मला......!

1 min
274

काहीतरी सांगायचंय मला

भेटशील का तू एकदा

विचारांचे वादळ हे

डोकावते कितीदा


राहून गेल्या बऱ्याच गोष्टी

मनमोकळं नाही बोलता आलं

तेव्हा जे जे पटल मनाला

तेवढ्यापूरतच जगता आलं


काहीच न बोलता

मन कसे वळेल

उमलल्या भावनांचा

गंध कसा कळेल


दंग होतास तू

चित्र माझे रेखाटताना

मनोमनी मी गुंतत होते

फक्त तुलाच पाहताना


ही यातना मनाची 

तुजला एकदा कळावी

काहीतरी सांगायचंय मला

अशी कविता मी स्फुरावी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance