STORYMIRROR

Suhas Belapurkar

Others

3  

Suhas Belapurkar

Others

ऐकू दे माझा मला या, अंतरीचा गुढनाद

ऐकू दे माझा मला या, अंतरीचा गुढनाद

1 min
22

ऐकू दे माझा मला या,

अंतरीचा गुढनाद


कधी मोजले, किती सोडले

कितीक धरले, तरी ओघळले


कधी हरवले, कधी गवसले

कधी समजले, कधी न गमले


कधी पडलो, तरीही उठलो

कधी घसरलो, तरी सावरलो


कधी रडलो, तरी हासलो 

कधी हासलो, तरी मनात रडलो


कधी जिंकलो, कधी हारलो 

कधी फसलो, वेळीच सावधलो


कधी भजलो, कधी पूजीलो

कधी वरमलो, सदा नरमलो


व्यक्त होता कधी, अव्यक्तहि झालो

व्यस्त असता कधी, त्रस्तहि झालो


मुक्त असूनही, रिक्त नाही

नव शोधाच्या प्रेरणेने, अजूनही तृप्त नाही



Rate this content
Log in