मनस्पर्शिका
मनस्पर्शिका
स्पर्शिले मनास अजाणता एकदा
आठवाच्या गावी जाता जाता
रूणझूणले सप्तसुर पावलात विणले
वळणवाटा बेधुंद पाहता पाहता
छंदिल्या घननिळ्या सागराच्या लाटा
आसमंती इंद्रधनु नृत्य करता
लख्ख चमकली बिजली तेव्हा
मनमोराचा शृंगार कवेत हसता
हर्षिल्या दवबिंदुच्या तृषार्त जलधारा
रविकिरणांच्या सोनेरी उन्हात न्हाता
पारिजातक सुगंधी होता मोहरला
ती ओळखीची एक शीळ ऐकता
पारिजातक सुगंधी होता मोहरला
ती ओळखीची एक शीळ ऐकता

