STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

3  

Pallavi Udhoji

Romance

ही रात गेली

ही रात गेली

1 min
12.1K

ही रात आहे एका वैराची

पोटात आग माझ्या ही पेरून गेली

आल्या कुठूनी या जखमा 

मनावरी माझ्या ठेऊनी ही रात गेली  


गाढ निद्रेत राहिले मी 

बंध हळुवार तुटूनी गेले 

अशी तोडूनी रात ही गेली


असती जमा ही सगळी 

ओस झाली या धरतीवरती

डोक्यात फक्त आसव उरूनी

जागुनी ही रात गेली


क्षणात लाभलेल्या त्या क्षणांना

स्पर्श तुझा होताच

अलगद लाजून ही रात गेली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance