मन माझे हे गुंतता
मन माझे हे गुंतता
स्थिराऊनी नजर तुझी
श्वास माझा रोखुनी
लाभता तुझा स्पर्श
उच्छवास सोडला मी
मंद धुंद एकांती
जवळी घे मला जरा
नजर ही गुंफुनी
मन माझे गुंतता
बहर आला मनाला
दही दिशा घुमूनी
शांत वारा वाहतो
उसळूनी येते प्रीत आपुली
एकांत ह्या क्षणी
टिपूनी घेऊनी हे क्षण
साक्ष देते ही मिलनाची
फिरुनी नवी जन्म घेऊनी
असे आपुले हे मुलं
पूर्ण झाली मनिषा माझी
स्वागताला उभी राहुनी
वाजवी तू ही बासुरी

