पहिल्या प्रेमाची कैफियत
पहिल्या प्रेमाची कैफियत
वाटत होते जावे कुठे तरी दूर .....
जिकडे असेल शांती ना अश्रूंचा पूर .....
डोळे गेले होते ताठरून पाहून त्याची वाट .....
बहरून बरसेल ती मनातली धुंध बरसात .....
पाहिले जेव्हा मी त्याला गेले होते हरवून ......
माझ्या बेरंग जीवनात आले रंग बहरून .......
मी केला बहाणा पुस्तक मागण्याचा .....
पाहताच होता तू आवडला हा हेतू होता सांगण्याचा .....
त्याचे ते स्मित काळजात रुतून बसले ......
मला स्वतःला नाही समजले मी ह्यात कशी फसले ......
बोलणे सुरु होऊन मैत्री झाली घट्ट ........
सतत त्यालाच भेटू आपण मन करू लागले हट्ट ....
एकदा केले जाहीर आहे प्रेम तुझ्यावर ......
त्याने दिला हसून नकार घाव झाला माझ्यावर ......
त्याचे प्रेम होते आधीच कोणावर तरी .......
मनातून वाटले दिसायला आहे तिच्या पेक्षा मी बरी ......
तुटले हृदय हरले होते प्रेम .....
माझ्या नशिबाने माझ्या सोबतच केला होता गेम ......
उडाला प्रेमावरचा भरोसा .....
कसे समजाऊ त्याने नाही दिला धोका ......
प्रेम हि भावना आहे जगात भारी .....
जाताना त्या रस्त्याने अडकडली माझी गाडी .......
तुटके हृदय घेऊन आहे आता मी फिरत ......
ह्या कविते मधून मांडली माझ्या पहिल्या प्रेमाची कैफियत .......
असेल कोणी तरी माझ्यासाठी बनलेला भेटेल एकदातरी ....
वाट पाहते मी त्याची जो घेऊन जाईल मला बायको म्हणून त्याचा घरी.....
