STORYMIRROR

Prajakta Waghmare

Romance

3  

Prajakta Waghmare

Romance

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
259

हृदयाच्या कोपऱ्यात घर करून असतं

कितीही विसरायचं म्हंटल तरी

हे विसरता येत नसतं

कडू गोड आठवणी घेऊन कायम सोबत राहतं


कधी हे चेहऱ्यावर हसू उमटवतं

तर कधी भावना अनावर होऊन

अश्रूंना वाट मोकळी करून देतं

पण कधीना कधी नक्की आठवतं


फक्त चांगल्या क्षणांमुळे आठवत नसतं

तर काही तिखट अनुभवामुळे

देखील सुद्धा हे आठवत असतं

कितीही पुढे गेलो तरी पाठवलाग मात्र करतं


पहिलं प्रेम हे विलक्षणच असतं

कारण असतं काहीच ते पूर्ण 

तर काहींच अपूर्ण

 पण तरी हृदयात कडू गोड आठवणीं घेऊन कायमसाठी ते वसतं.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance