STORYMIRROR

Rajesh Sabale

Romance

3  

Rajesh Sabale

Romance

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
13.7K


आयुष्याच्या संध्याकाळी, आठवतेस तू कातरवेळी।

तोच पार अन तीच आगासी, तेच स्वप्न अजून उराशी।।धृ।।


तुझी अन माझी प्रीत फुलापरी, कळी सारखी उमलत जाई।

गजरा होता माळलास तू, वेणीवरती तो झोके घेई।।

स्वप्नामधल्या गोड कळीचा, ध्यास मनाशी आहे जराशी।

झोपळाही बंधित फिरतो, तुझ्या प्रीतीची आस जराशी।।१।।


आठवते का सांज वेळ ती, इथेच घडली प्रेम कहाणी।

रोज पाहतो याच ठिकाणी, वाट तुझी मी केविलवाणी।।

सांगतो कानात तुला मी, गुपित मनातील थांब जराशी।

त्या भेटीचा अजून येतसे, गंध सुवासिक अजून जराशी।।२।।


जुन्या पुराण्या फोटोमधला, पडका वाडा घाटावरचा।

त्या घाटाच्या मातीमधला, फोटो आपला तरुणपणीचा।।

घाटावरच्या पायरीवर तू, बाळगलेस जे स्वप्न उरासी।

डोळ्यामध्ये अजूनही दिसतो, नदी काठच्या घाट जराशी।।३।।


हातात होते हात दोघांचे, मन वाऱ्यावर विहरत होते।

त्या भेटीची अजून मलाही, मोर पिसाची आठवण येते।

डोळे होते डबडबलेले, भीती अनामिक होती जराशी।

उगाच पाहिल चोरून कोणी, म्हणून वाटते खंत उराशी।।४।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance