पहिली भेट...
पहिली भेट...
होती वाटेत
किरकिर ती काजव्यांची
रात्र चांदण्यांची
निरागस...
पहिली भेट
थेट तुझ्या हाताशी
उरल्या आसवांशी
झालेली...
भेटीचे आपल्या
क्षण आनंदाचे ठरले
ठसे उरले
आठवांचे...
आजही आठवतो
हातातला तुझा हात
नदीचा काठ
शहारलेला...
किती सुरेख
होता भेटीचा क्षण
भरले मन
आठवणीने...
आज पुन्हा
हरवलो तुझ्या आठवणीत
क्षणांच्या साठवणीत
भेटलेल्या...
