STORYMIRROR

Rutuja kulkarni

Romance

4  

Rutuja kulkarni

Romance

पहिली भेट

पहिली भेट

1 min
279

आठवतेयं का तुला सख्या आपली पहिली भेट? 

काळजाची एकमेकांशी जिथे ओळख झाली होती थेट। 


अबोल होते अधीर नयन खूप बोलत होते

तुझ्या माझ्या नकळतं एक रेशीमबंध जुळले होते। 


नजरेचा नजरेशी नेमका कोणता खेळ चालू होता? 

एकमेकांना पाहताना जीव नुसता आतुर होत होता। 


पहिली भेट ती तशी खूप चं अजब होती

तुझ्या माझ्या फुलतं जाणार्‍या प्रेमाची गोष्ट वेगळी होती। 


सुंदर ती पहिली भेट खूप अविस्मरणीय होती

पहिल्या चं भेटीत एक अनामिक ओढं होती। 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance