पहिले पत्र
पहिले पत्र
जेव्हा मी पत्र पहिले पत्र लिहिले
फक्त आणि फक्त तुलाच त्यात पाहिले
जागेपणी देखील होते स्वप्नात राहिले
उज्वल भविष्याचे दोघांच्या पाहिले मी पाहिले
प्रत्येक ओळीत प्रत्येक पानावर ह्रदय मांडले
भावनारूपी अश्रू कागदावर नकळत सांडले
केले व्यक्त पत्रातून जे होते मनात साचले
माझ्या डोळ्यातील प्रेम तुझ्या नजरेने वाचले
साकारले स्वप्न पत्रातून भाव मनीचे जुळाले
अव्यक्त भावनांना पत्रातून प्रेममयी नाते मिळाले

