पहिले प्रेम
पहिले प्रेम
फुलासवे प्रेम बहरत दिसावे
शुद्ध भावनांचे वचन निभावे
फूल, झाडांत रममाण व्हावे
कामवासना मनी नसावे
फुलासवे प्रेम..........
स्वच्छ सुंदर प्रभात काळी
आकाशाच्या छत्रा खाली
हलकी करावी दुःख आपली
स्वच्छ विशाल अंतरंगातली
फुलासवे प्रेम.............
पक्ष्यांच्या सूरात सूर मिसळावे
आदर्श त्यांचे जरूर घ्यावे
धोका कधी सख्यास नाही
आदर्श जीवन मानवास ठेवी
फुलासवे प्रेम.........
पाण्यासारखे स्वच्छ असावे
त्याच्यासारखे पावित्र्य जपावे
दुःखात नित्य आधार व्हावे
क्षमाशील आणि संयमी दिसावे
फुलासवे प्रेम.............