पहिले प्रेम
पहिले प्रेम
प्रेम असावे जाती, धर्माची बंधने तोडणारे
अति विश्वासाचे, रक्ताच्याही पलीकडचे
पाण्यासारखे निर्मळ,स्वच्छ मनाचे
विश्वात सुंदर विचार पेरण्याचे
प्रेम असावे.........
देश, भाषा, प्रांताचे जोखड फेकणारे
बुरसटलेल्या विचारांची होळी करणारे
मनाचे भावविश्व सतत जपणारे
मानवा मानवात मेळ घालणारे
प्रेम असावे........
जगण्याला नित्य अर्थ देणारे
विचारांचा मेळ आयुष्यात साधणारे
ऋणानुबंधाचे,नाते अतूट राखणारे
सुख दुःखात आयुष्याची सोबत असणारे
प्रेम असावे........
एकमेकांचा जीव सतत जाणणारे
धोकेबाज, अविश्वासू,स्वार्थी नसणारे
आठवणीत, भावनामय मन शोधणारे
आयुष्याची गाठ पवित्र बांधणारे
प्रेम असावे..........