STORYMIRROR

Vanita Shinde

Romance

2  

Vanita Shinde

Romance

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
14.1K


आला पहिला पाऊस

सोबतीला वीज, वारा,

चिंब भिजूनी हर्षाने

आनंदली सारी धरा...


सुखावला बळीराजा

राबू लागला रानात,

पिक सोन्यावाणी यावे

स्वप्न घेऊनी मनात...


तापलेली काळी आई

होती आतूर भेटाया,

पावसाच्या सरीसंगे

लागे हिरवळ दाटाया...


सरीवर येता सर

नदी वाहे खळखळ,

पसरला चोहीकडे

मातीचा या दरवळ...


कोकीळेची कहूकहू

गूंजे आवाज मधूर,

थुईथुई तालामध्ये

नाचे डौलात मयुर...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance