STORYMIRROR

Mina Shelke

Romance

3  

Mina Shelke

Romance

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
28.9K


ढगांनी भरलं आभाळ

सखे जरा सांभाळ तोल

मृगाच्या पहिल्या सरीचा

बघ वाजतोय आता ढोल…


थुईथुई पाऊसधारा

सोबतीला गार वारा

मातीचा तो मृदगंध

श्वासात शोधतो किनारा…


छेडून गेली सर पहिली

काळजात प्रेम फुलोरा

रोमरोम शहारून हर्षिला

मनाचा हळवा कोपरा…


न्हाऊ घाल माझ्या मना

मोरपंखी हळूवार स्पर्शाने

उजळू दे सोनसळी काया

आज सांज ओली हर्षाने…


पावसात चिंब चिंब

भिजली सुकुमार काया

धरा भासे सौदामिनी

निसर्गाची सोनेरी माया…


आले प्रितीला उधाण

चल गाऊ प्रेमाच गाणं

गूंफुनी करात कर सख्या

ओंजळीत झेलूया सुखाचे दान…


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance