STORYMIRROR

Anonymous None

Romance

3  

Anonymous None

Romance

पहिला पाऊस आमच्या प्रेमाचा

पहिला पाऊस आमच्या प्रेमाचा

1 min
28.6K


पहिला पाऊस आमच्या प्रेमाचा

नभी दाटून आलेल्या भावनांचा...

चिंब ओला क्षण प्रशांत रातीचा

स्तब्ध करुण स्पंदित हृदयाचा...

भरगच्च धीरसैल भावनांनि

काठ ओलांडला नयनकिनाऱ्याचा...

मोतीदार डोळ्यांच्या शिंपल्यानि

पाऊस पाडला गोड आसवांचा...

काळोखी मेघ भावनांच्या तिचे

डोळ्यात एकवटून दाटून आले...

प्रेम माझे काळजातील तिच्या

अश्रूसवे खळखळ वाहून गेले....

मस्तक तिचे हृदयावर होते

ओल्याचिंब स्पर्शांनी भिजून गेले

ती मनसोक्त रडत होती

मन माझे मात्र हरपून गेले....

    

पाऊस प्रेमाचा पहिलाच होता

हौसेनं भिजून हसण्याचा होता...

पाऊस मधून मधून पडत होता

विरह संपवून मिलन घडवत होता...!

(७-३-१३ | दुपारी २:४२ वा )  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance