पहाट अशी ही गावाकडची
पहाट अशी ही गावाकडची
अबोल शब्द सखोल प्रेम
रोज दाटते हिरवळ मनी,
पाहाट अशी ही गावाकडची
रुणझुणते मझ्या उरी,
रोज नभाचे रंग नवे
पहाट ही कोवळी,
पहाट अशी ही गावाकडची
रूनझुनते मझ्या उरी
सूर्योदयाच्या या वेळेला मन हे स्पूर्थ होई ,
तो दिवस नवी उमेद घेऊन येतो
आणि निघून जातो घाई घाई
पण पहाटेचे तो आनंद
दिवस सारा उजळून नेई
पण पहाट अशी ही गावाकडची
रुणझुणते माझ्या उरी
