पेलते भार...
पेलते भार...
पेलते भार
ती आयुष्याच अजुनी
ओझं जाणुनी
जगु नये
श्वासात आसक्ती
जगण्याची दिशा देते
वाट असते
सोबतीस..
ओझं म्हणुनी
ज्यानी वयस्कर जणिले
स्वभिमानाने स्विकारले
जीवनही
चालते वाट
थकले पावले जरी
ओझं पाठीवरी
कमी नसे ...
जीव जिवात
असे तोवर जगणं
दुज मागणं
नसे,
कष्टाची साथ
अजूनही चालते एकली
कांती सुकली
जरि असे ...
व्यथा मांडली
कथा कष्टी जाहली
चित्रात साहली
संबोधते
सावलीची आस
सुटली मागे गावं
कस सांगावं
जगावे ..
डोळ्यातली भाव
वाचतील कथा जुनी
ओझ भारवूनी
ओझरतसे
ओंजळीत अश्रु
सर दुख्ख्ची साथीला
सुखाच्या राशीला
कष्ट साथी
माणसा माणसा
हो जागा आतातरी
कोरलिसे क्षितिजावरी
नक्षी..
आसवांचे तिला
भान राहिले नाही
जणिले काही
जीवास या
जीवनात उदार
जाहले मन असे काही
क्षण जरासाही
थांबेना
पेलते भारही
सरल्यावर लागणार्या जळणाच
चालते आयुष्याच
जीवनवाट
