पेला अर्धा भरलेला
पेला अर्धा भरलेला
पेला अर्धा भरलेला
माझ्या वाट्याला आलेला
त्याच्या त्या अर्धेपणाने
दुःखी करून गेलेला
सतत सलायचा मनाला
तो अर्धा अवकाश
त्यामुळे सदा अस्पर्शी
तो अर्धा पूर्णांश
सतत झुरणं माझं
नसलेल्या त्या सुखासाठी
मनभर मस्त जगूनही
रितेपणाची जाणीव खोटी
अचानक दिसला मला
भाग भरलेला अर्धा
गवसलेल्या सुखाची मग
मनात सुरू स्पर्धा
करंटेपण माझं आता
मला खुपून गेलं
ओंजळीत आलेलं माझ्या
फटींतून निसटून गेलं
समजलंय मला आता
सुख अर्ध्या पेल्यातलं
न हिंदकळता न सांडता
पूर्ण वाट्याला आलेलं
