STORYMIRROR

Prashant Shinde

Classics

2  

Prashant Shinde

Classics

पौर्णिमा

पौर्णिमा

1 min
14.9K



आज वटपौर्णिमा

सगळं सगळं लहानपणापासूनच आठवलं,

आईच्या लगबगीचंं चित्रण सार

पुन्हा डोळ्यापुढे साकारलं...


पावित्र्य परंपरा रूढी सार कसं

उत्साहात कौतुकात पार पडायचं,

सणवार व्रत वैकल्य खूप आनंदच

आणि मजेशीर असायचं...


काळ बदलला विचारसरणी बदलली

पण आजही नाळ शाबूत राहिली,

स्त्रीने कर्तृत्वाचा वसा घेतला विज्ञानाचा हात धरला

वसुंधरेच्या रक्षणासाठी आपला दृष्टीकोन बदलला...


वडाला आपल्या अंतरी पुजला

मानस पूजा करता करता,

वडाला चित्ररूपात पाहिला

सारा प्रेम भाव सौभाग्याचा हृदयी साठवला...


भाव तिथे देव हे ती जन्मोजन्मी जाणते

आजही पतीलाच परमेश्वर मानते,

खरेच पौर्णिमेच्या चंद्राला पाहून

गृहलक्ष्मीचे पूर्ण दर्शन होते,

तेव्हाच कोठे आपले भाग्य खरे खुलते....!!!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics