पैशाची किंमत
पैशाची किंमत
जेव्हा पैसे नसतात खिशात,
हौस मारली जाते मनात(१)
नकोशी वाटतात तेव्हा फिजुल खर्चा,
कुठे फिरणे, खाणेपिणे नको ती चर्चा(२)
भूक लागली असते, येतो भाजीचा वास,
काय पोट भरणार मुखी नसतो घास(३)
नसते पीठ गव्हाचे नाही तांदळाचा दाणा,
कुठे पोळी पुरणाची फक्त आम्हा विचार तो मना(४)
कसे पडणार बिमार कुठे असतो हो पैसा,
दिवस हलाखीचे काढतो नाही जीवनाचा भरवसा(५)
दिवस येईल सुखाचे या आशेवर जगतो,
खचले असेल मन जरी खंबीर उभा मी राहतो(६)
कसले सणवार कोणती असते दिवाळी - होळी,
आम्हाला आसची असते फक्त कोरभर पोळी(७)
राब - राब राबून कष्ट शेतकरी करतो,
शेवटी जगाचा पोशिंदा मात्र उपाशीच मरतो(८)
