गर्व नसावा जीवनात
गर्व नसावा जीवनात
गर्व नको रे
करू माणसा,
नाही जीवनाचा
येथे भरवसा (१)
राहून जातो
येथेच पैसा,
मेल्यावर त्याचा
उपयोग कसा (२)
नाशवंत देह
जळूनी जाते,
पाप,पुण्य सगळे
येथेच राहते (३)
कर्माचे फळ
देतो ईश्वर,
कोणीही तयापासून
नाही सुटणार (४)
मग का असावी आयुष्यात
कीर्ती,नाव,प्रसिद्धीची अपेक्षा,
काय मोठे झाली आपण
आपले रक्षण करणाऱ्या देवापेक्षा (५)
जीवन गेले अपुले
लोकांचे पाय ओढण्यात,
काय अर्थ आहे असे
जीवन जगण्यात (६)
मानवी हे देह
दिले देवाने,
नाव अजरामर व्हावे
अपुल्याच रे कार्याने (७)
करावे असेही काही जीवनात
नाव लोकांनीही घ्यावे,
उल्लेख होताच आपला
क्षणात आपण आठवणीत यावे (८)
