घाव झेलताना झाडाचे मनोगत
घाव झेलताना झाडाचे मनोगत
अरे माणसा माणसा
किती करशील वार
कसे विसरला तू
मी दिलेल प्रेम अपार(१)
अरे मीच दिली तुला
फळ आणि छाया
मला देताना घाव
तुला नाही आली माया(२)
अरे ऊन्हाणे थकून
माझ्या कुशीत यायचा
किती निवांत तू
माझ्या सावलीत झोपायचा(३)
माझ्याच फांद्यानी किती
दिला तुला झोका
शेवटी तूच मला दिला
एवढं मोठं रे धोका(४)
नको करू आता घाव
नाही सहन होत त्या वेदना
किती दुखावल्या तूने
माझ्याच रे भावना(५)
स्वार्थासाठी घाव दिले तू मला
मिळणार शिक्षा तुला सोसायला
कळणार तुला लवकरच
वेळ नसणार मग भोगायला (६)
