कसं काय बरं का
कसं काय बरं का
कोण येथे अपुला
कोण येथे परका,
नाही कोणी विचारणार
कसं काय बरं का(१)
असो कपडा स्वच्छ वा
असो कपडा मळका,
नाही कोणी विचारणार
केली आज अंघोळ का(२)
खिसा असो भरून
वा असो खाली,
नाही कोणी विचारणार
कोणासाठी एवढी मेहनत चालली(३)
गरीब जगला का
गरीब मेला का,
नाही कोणी विचारत
पोटभर आज जेवला का(४)
धावपळीची ही दुनिया
नाही कुणाकडे वेळ,
नाही कोणी विचारणार
हे जीवन आहे का चाललय खेळ(५)
सृष्टीचा निर्माता देव
आपण त्याची रचना,
नाही कोणी विचारणार
जपली का मानवी भावना(६)
