गणित आयुष्याचे
गणित आयुष्याचे
जीवन जगणे सोपे नसते
ते सोपे बनवायचे असते,
परिस्थितीशी हार मानत
रडत दुःखात बसायचे नसते(१)
सगळे होईल मनासारखे
असे कुठेही लिहिलेले नसते,
नाहीतर आपल्याला या जगात
गरीब कोणीही दिसले असते (२)
आयुष्यात समस्यांशी दोन हात करत
जीवन हसत नेहमी जगायचे असते,
नेहमी नशिबाला दोष देत
दुःखात कधी पिसायचे नसते(३)
येतील क्षण कठीण जरी
धीर सोडायची नसते,
निघून जाईल ते क्षण पण
आयुष्यात आशावादी राहायचे असते(४)
मिळेल अनेक लोक जीवनात
त्यांना सर्वांना लक्षात ठेवायचं नसते,
ज्यांनी आपली मदत केली
त्यांना आयुष्यभर जपायचे असते(५)
आयुष्यात नेहमी तक्रार
करत बसायचे नसते,
छोट्या छोट्या गोष्टीत
आनंदाचे क्षण शोधायचे असते(६)
नेहमी समाधानात जीवन
जगणे सोडायचे नसते,
देवाने दिलेल्या सुंदर आयुष्याचे
आभार नेहमी मानायचे असते(७)
न दुःख भूतकाळाचे
न चिंता भविष्याची,
फक्त वर्तमानात जगून
आयुष्याची मजा लुटायची (८)
