STORYMIRROR

Ankush Dhobale

Romance

3  

Ankush Dhobale

Romance

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
189

मी उन्हाळी कावळा

तू पावसाळी कोकिळा,

गीत प्रेमाचे गाताना

झालीय गर्दी ही गोळा (१)


मधुर आवाज हा तुझा

या कावळ्याला नित यावा,

तुझ्या आठवणीत कावळा हा

स्वप्नात बुडून जावा (२)


सावळा रंग हा माझा 

जणू एक अप्सरा

माझा आवाज कर्कश

तुझ्या आवाजात स्वर्ग सारा(३)


किती गाऊ तुझे गीत

नाही मन माझे भरत

थोडी जागा असू दे

तुझ्या कठोर हृदयात(४)


नाही तोडणार विश्वास तुझा

ही शपथ मी घेतो

तुझ्यामागे मागे मी सर्वांना 

ताई आईच समजतो(५)


फक्त एकदा तू माझ्या 

जीवनात प्रवेश कर

बांधू आपण एकत्र 

अपुल्या प्रेमाने घर(६)



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance