STORYMIRROR

Supriya Devkar

Romance Others

4  

Supriya Devkar

Romance Others

पायवाट प्रेमाची

पायवाट प्रेमाची

1 min
356

पायवाट प्रेमाची सखे दारी तुझ्या थांबते

चाहूल तुझी लागता चोरून पहा सांगते 


नसते मनी उगाच तरीही वाट वाकडी चालते

प्रेमाचा हा खेळ आगळा मनाला अलवार तोलते


ओबडधोबड वाटेवरती लागते कितीदा ठेच

तरीही वेंधळी वाट म्हणते प्रेमाचे काटे वेच


कशाला हवा अट्टाहास नकोच प्रेमाचा गुलकंद 

ठेच लागता चमकून उठती काजव्यांचे छंद


भीती उगाच लावून घ्यावी कशाला प्रेमाची ?

का आणावी वेळ स्वतःवर अवघडून जगण्याची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance