STORYMIRROR

Suchita Kulkarni

Inspirational

4  

Suchita Kulkarni

Inspirational

पायरी प्रेरणेची

पायरी प्रेरणेची

1 min
328


ध्येयवेड्या वाटेने

आज मी चालावे

आकाश घ्यावे

कवेत


प्रेरणेची पायरी

एक एक चढावी

वाट चालावी

आनंदाने


ठेंगणे आकाश

मनी स्वप्नांची आरास

उरी ध्यास

ध्येयवेडा


खाचखळगे परी

 माझ्या आयुष्यात येती

खंबीर राहती

मनाने


सकारात्मक दृष्टी

पहावी सारी सृष्टी

नसावे कष्टी

जीवनी


स्वप्न सत्यात

कष्टाने पुरी करावी

भरारी घ्यावी

गगनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational