पावसाळी मेघ
पावसाळी मेघ
मेघ पावसाळी आले
बरसती जलधारा
होऊनिया ओलीचिंब
मोहरली वसुंधरा।।
शालू नेसुन हिरवा
धरा लाजली सजुनि
वारा छेडितो तिजला
गाली हसे ती अजुनि
तृप्त होऊनि अवनी
न्याहाळिते प्रियकरा।।1।।
चिंब झाले तरुवर
वेली बिलगल्या त्यास
तृप्त झाला चातकही
हरे तयाची ती प्यास
जीव सारे सुखावले
हसे परिसर सारा।।2।।
वारा हा खट्याळ भारी
बघा छेडितो पदरा
धुंद बरसती धारा
अंगी उठतो शहारा
थेंब टपोरे हळूच
बघा चुंबती अधरा।।3।।
