पावसाळा
पावसाळा


ढगांचा कडकडाट
विजांचा गडगडाट
घेऊन येई
पावसाचा थाट
चातकाची तहान
शेतकऱ्याची आस
पावसाळा आहे
ऋतू खास
सुगंध मातीचा
थंडावा हवेत
आशेचा किरण
पसरे आसमंतात
वाहणारे धबधबे
हिरवागार निसर्ग
रानफुलांचा देखावा
वाटे स्वर्ग
धरती सारी
मोहक दिसे
नव्या नवरीसारखी
मज भासे