STORYMIRROR

Anonymous None

Romance

3  

Anonymous None

Romance

पावसाला सांगशील कधी

पावसाला सांगशील कधी

1 min
25.8K


पावसाला सांगशील कधी

त्याची येण्याची चाहूल

मातीच्या सुवासाने

तुला सोबत घेऊन येईल

एकटा मी काय भिजावं

तू थेंबातून आलीस की

सोबत भिजताना तुझ्या

गारवा मला सामावून घेईल

शहारलेल्या अंगावर तुझ्या

मनं माझं बरसेल

भुरळ स्वर्गाची घालून

हरवून स्वतःला बसेल

तू आणि पाऊस यात

माझं काहीही नसेल

तुझ्या बहरलेल्या तारुण्यात

पाऊस मला गवसत असेल 

५-८-१६ | दु १२:१९ वा  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance