पावसाच्या सरींनो!
पावसाच्या सरींनो!


पावसाच्या सरींनो लवकर या जरा
उन्हाळ्याच्या त्रासापासून सोडवा चला
उन्हामुळे निसर्ग रम्य करपला
प्राणीमात्रा असह्य दाह जाहला
नभात कृष्णमेघांनो या तुम्ही जरा
वीजांसमेत गडगडाट सूरू करा चला
थंडगार वाऱ्यासह आगमन करा
पावसाच्या सरींनो लवकर या जरा
उन्हाळ्याच्या त्रासापासून सोडवा चला
रात्रीही नसे आताशी गारवा
थंडाव्यास जीव हा वेडावला
बरसूनी चरास चिंब भिजवा जरा
इंद्रधनू तृष्ण तृप्त पाहूया चला
संतत धार होवूनी बरसत राहा
पावसाच्या सरींनो लवकर या जरा
उन्हाळ्याच्या त्रासापासून सोडवा चला
वाऱ्यालाही साथीने तू आण पावसा
मातीलाही रंग सुगंध दे पावसा
मुसळधार होवूनी कोसळा जरा
निसर्गास हिरवी छटा द्या तुम्ही चला
पावसाचा जोर सतत राहू दे जरा
पावसाच्या सरींनो लवकर या जरा
उन्हाळ्याच्या त्रासापासून सोडवा चला