STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Abstract Action Others

3  

Anjali Bhalshankar

Abstract Action Others

पावसाचा हिरमोड

पावसाचा हिरमोड

1 min
207

तू आलास ना की

काव्याचा गंधही नसलेल्या

व ते कशाशी खातात,


लेखन संस्कृतीशी

देणेघेणे नसलेल्यां

नाही कविता सूचु लागतात


तुझे थेंब खिडकीतून

अंगावर येतील म्हणून

प्रशस्त दिवाणखान्यात

खिडकीपासून शक्य

तेवढे दूर बसून कागद-पेन घेऊन

चहा भज्यांचा आस्वाद घेत

हे लिहायला बसतात


धो धो बरसणार्‍या पावसात

चुकून घरातले कोणी

ओल्याचिंब होऊन धावत पळत

आले की यांचा राग

तळपायाला जातो


का बाहेर हुंदडायचे

आभाळ भरून

आलेले पटकन घरी यायचे

आता सारे घर ओले करू नको

चटकन आत जा डोके कोरडे कर

कपडे बदल लहान नाहीस

आता तू तुझं शोधून घे

मला पावसावर लिहायचं

शांतपणे लिहू दे 


शाळेत अभ्यासाचा

पुस्तकात वाचलेले

पावसाचे वर्णन

गावोगावच्या पावसाच्या

बातम्यांचे समालोचन

दूरचित्रवाणीवरील हवामानाचे संदर्भ

या साऱ्याची मनोमन

करायची जुळवाजुळव 

कसेबसे यमक जुळवून

फोनवर चार ओळखीच्या लोकांना

पाठवून म्हणायचे

अभिप्राय कळव


शुल्लक गोष्टींसाठी

कोण नसती आफत ओढवून घेतो

उत्कृष्ट !छान!सुंदर !

असे फुकटचे मत पाठवतो

खऱ्या दर्जेदार लेखनाचा

इथेच बट्ट्याबोळ होतो

असाच पावसाचाही हिरमोड होतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract