STORYMIRROR

Shital Yadav

Fantasy

3  

Shital Yadav

Fantasy

पाऊस

पाऊस

1 min
14.4K


नभ भरुनी आले अभ्र दाटूनी आले

मन हर्षूनी गेले चित्त आकर्षित झाले


दामिनीच्या नृत्याने भूमंडल व्यापले

गडगडाटाने जणू ढोल मृदंग वाजले


आकाशी मस्तवाल नवतरंग उमटले

मातीच्या गंधाने आसमंत दरवळले


हिरवळ पसरुन वृक्षवल्ली बहरले

अलौकिक दिव्य वरुणराजाने केले


मनमोही अंबुधर धरणीवर बरसले

नभोपटलावर सतार जणू कोणी छेडले


चिंब होई रानमाळ करी साजरे सोहळे

कधी शिंपण अमृताचे कधी ऊन कोवळे


इंद्रधनूही पावसात आवर्जून हजर झाले

अविस्मरणीय देखाव्याचे चक्षू साक्ष ठरले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy