पाऊस...
पाऊस...
तिच्या मनात हुरहूर लागली होती;
तो येईल असं तिला सारख वाटत होत आणि तसच झालं.
तो नेहमीसारखा काहीच वर्दी न देता अचानक आला.
मग तिची धांदलच उडाली, तिला काय करावे हेच सुचेना.
ती त्याच्याकडे एकटक पहातच राहिली;
तिला त्याचं आणि पावसाचं येणं नेहमीच सारख वाटतं.
मग असाच कधी पाऊस आला की, ती त्याच्या आठवणींचा पाऊस नयनांतून बरसवते.
