पाऊस
पाऊस
आम्ही तिघी मैत्रीणी
गेलो होतो खरेदीला
सोसाट्याचा वारा आला
काळे ढग लागले गर्जायला.
पाहता पाहता टप टप
थेंब लागले पडायला
मातीचा मृदूगंध
श्वासाश्वासात दरवळायला.
बघता बघता रस्त्यावर
पाणी लागले वहायला
निसर्गाचे रुपडे गोंडस
लागले प्रतिबिंब पहायला.
दोघींनी घेतल्या छत्र्या
मला आवडते भिजायला
मधात घेतले तरी मला
घराकडे लागलो चालायला.