STORYMIRROR

Chaitrali Dhamankar

Romance

3  

Chaitrali Dhamankar

Romance

पाऊस

पाऊस

1 min
14.1K


झाली अचानक मेघ गर्जना

दाटूनी आले नभ एकाकी

वारे झोंबले असे तनाला

नयनी चमकली एक लकाकी ||

खिडकी बाहेर थेंब टपोरे

घालीत होते साद मला

खुणवित होते असे काहीसे

आलो मी तु सोड अबोला ||

पहिला पाऊस आला घेऊन

माझ्या मुखावर असा तजेला

विसरुन गेले दु:ख मनातील

झाले प्रफुल्लीत तिन्ही सांजेला ||

धरती भिजली पाणी चहूकडे

ओल्या मातीचा पसरे सुगंध

लोप पावला गंध फुलांचा

पावसात मी चिंब बेधुंद ||

लाट प्रेमाची आला उधळीत

एका छत्रीतील आठवली रात्र

पुन्हा एकदा आला तो क्षण

पहिला पाऊस आणि प्रेमपत्र ||

 

......चैत्राली धामणकर

 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance